रागसमय आणि कालातीत राग - सूर्यास्तानंतरचे राग

संध्याकाळ ते मध्यरात्र या दरम्यान अंतर्मुख करणारे, ऐकायला रम्य, आनंद देणारे असे अनेक राग आहेत. या रागांचा भर वरच्या सप्तकावर आहे, त्यामुळे त्यांची चांदण्याशी सलगी सुरु आहे, असं वाटतं. राग संगीताच्या उस्तादांकडून या राग मालिकेचा आनंद घ्या.

Mandar Karanjkar की Sunset by the Sea (2019)Baithak Foundation

Raga Shree by Pt. Mallikarjun Mansur
00:00

तिन्हीसांज

तिन्हीसांजेला गायल्या जाणाऱ्या रागापासून आपण सुरवात करणार आहोत. संध्याकाळचं केशरी आकाश झपाट्याने आपले रंग बदलत जातं, आधी गडद लाल, मग जांभळा आणि शेवटी काळा. अनेक गोष्टी गमावून बसल्याचा आणि रिक्तपणाच्या सर्व आठवणी दाटून येतात. हा काळ अस्वस्थ करणारा असतो, कारण आपल्या व्यक्त न होणाऱ्या, नाजूक बाजूला तो साद घालतो.

Caspar David Friedrich की View of Arkona with Rising Moon, c. 1805-1806 (c. 1805-1806)Albertina Museum

Raga Hameer by Meera Banerjee
00:00

संध्याकाळचा उत्सव 

माणसाच्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेइतकीच त्याची विसरून जाण्याची क्षमता मोठी आहे. अस्वस्थ करणाऱ्या तिन्हीसांजेनंतर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेल्या संध्याकाळमध्ये आपण सहज प्रवेश करतो. हा अंधारामध्ये दिव्यांचा उत्सव आपल्यापर्यंत 'राग हमीर'च्या माध्यमातून येतो. 

Caspar David Friedrich की A Walk at Dusk A Walk at Dusk (about 1830–1835)The J. Paul Getty Museum

Pt. Vijay Sardeshmukh sings Raga Jaijaiwanti
00:00

चंद्रोदय

जसा जसा चंद्र उगवतो, तसं तसं मनही खुलत जातं. जयजयवंती हा असाच उत्साह वाढवणारा आणि लोभस राग आहे, आणि गडद होत जाणाऱ्या रात्रीइतकाच तो चिंतनशीलही आहे. 

Caspar David Friedrich की Forest Interior by Moonlight (around 1823/30)Alte Nationalgalerie, Staatliche Museen zu Berlin

Raga Bageshree by Nazakat Ali and Salamat Ali
00:00

'तरुण आहे रात्र अजुनी'

रात्रीच्या रागांचं वैभव अतुलनीय आहे. बागेश्री हा असाच रात्रीचा एक राग जो आपल्यावर मोहिनी घालतो. 

Jean-François Millet की The Sheepfold, Moonlight (1856-1860)The Walters Art Museum

Raga Malkauns by Ustad Amir Khan
00:00

रात्रीचे वैभव 

रात्रीचा गडद-गहिरा समय साजरा करत एखाद्या राजासारखा सिंहासनावर बसलेला आहे राग मालकौंस. चांदण्यात भिजलेला तो रोजच्या ऐहिक जगाच्या रहाटगाडग्यातून थकून गेलेल्याला शांत करतो.

लेखक: Fritz GoroLIFE Photo Collection

Raga Paraj by Pt. Kumar Gandharva
00:00

फक्त प्रारंभ 

रात्र आणि पहाटेला जोडणारा दुवा म्हणजे राग परज. दिवसाची सुरवात झाली आहे, यावर आपला विश्वास बसावा इतका हुबेहूब आभास हा उभा करतो. 

Caspar David Friedrich की Riesengebirge (around 1830-1835)Alte Nationalgalerie, Staatliche Museen zu Berlin

Raga Bhatiyar by Roshanara Begum
00:00

नवीन सुरवात 

दिवस आणि रात्रीचं हे अखंड चक्र सुरूच राहतं. नवीन आशा आणि आव्हानांना सामोरे जाण्याची नवी उर्मी घेऊन आपण नवीन दिवसाला सामोरे जातो. 

Mandar Karanjkar की Misty Morning (2019)Baithak Foundation

पहाट ते तिन्हीसांज 

पहाटेपासून तिन्हीसांजेपर्यंत गायल्या जाणाऱ्या काही भन्नाट रंगांचा खजीना येथे आहे. जरूर ऐका! 

क्रेडिट: सभी मीडिया
कुछ मामलों में ऐसा हो सकता है कि पेश की गई कहानी किसी स्वतंत्र तीसरे पक्ष ने बनाई हो और वह नीचे दिए गए उन संस्थानों की सोच से मेल न खाती हो, जिन्होंने यह सामग्री आप तक पहुंचाई है.
इन संग्रहों में मौजूद कहानियां

क्या Visual arts में दिलचस्पी है?

अपनी दिलचस्पी के हिसाब से बनाए गए Culture Weekly के अपडेट पाएं

अब आप बिलकुल तैयार हैं!

आपका पहला Culture Weekly इस हफ़्ते आएगा.

Google Apps